केडगावमधील जेएसएस गुरुकुलची शिवजयंती उत्साहात साजरी

केडगाव उपनगरात जेएसएस गुरुकुलच्या शालेय विद्यार्थ्यांची शिवजयंतीची मिरवणुक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या मिरवणुकीने संपूर्ण परिसर शिवमय बनला होता. लेझीम, झांज, लाठी-काठी पथकाने कलेचे सादरीकरण करुन उपस्थितांची मने जिंकली. भगवे ध्वज हातात घेऊन मिरवणुकीतील मावळ्यांनी शिवाजी महाराजांचा जयघोष केला

मिरवणुकीत शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, मावळे आदी विविध वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.  विद्यार्थ्यांनी तानाजी मालुसरे व शिवरायांचे प्रेम यावर सादर केलेल्या नाटिकेस नागरिकांची टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. तर बालाजी कॉलनी व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने या मिरवणुकीचे स्वागत करुन विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.