चर्मकार विकास संघ व लोकनेते सितारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी निशुल्क वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन
शहरात चर्मकार विकास संघ व लोकनेते सितारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने निशुल्क राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.2 जानेवारी रोजी टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात होणार्या वधूवर परिचय मेळाव्यात समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन चर्मकार विकास संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, शहर जिल्हाध्यक्ष बलराज गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष निलेश आंबेडकर, गटई अध्यक्ष अर्जुन कांबळे, सचिव संतोष कदम, युवक अध्यक्ष संतोष कांबळे यांनी केले आहे.
मेळाव्याचे उद्घाटन खासदार सदाशिव लोखंडे व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संदीप घनदाट, उमेश परहर, आदिनाथ बाचकर, प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, प्रा. सुभाष चिंधे, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, सुनिल त्र्यंबके, रामदास सोनवणे आदी उपस्थित राहणार आहे.
वधू वर व पालक परिचय मेळावा हा पूर्णपणे निशुल्क असून, राज्यस्तरावर होणार्या या मेळाव्यासाठी चर्मकार समाज बांधवांनी आपल्या विवाह इच्छुक असलेल्या अविवाहित, घटस्फोटीत, विधुर, विधवा व अपंग वधू-वरांसह रविवारी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे. सकाळी 10 वाजल्यापासून नाव नोंदणी सुरु होणार आहे. राज्यभरातून येणार्या समाजबांधवांसाठी अल्पोपहार व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. हा मेळावा यशस्वी होण्यासाठी वधू-वर व पालक परिचय समितीचे अध्यक्ष इंजि. तुकाराम गायकवाड, अरुण गाडेकर, अरविंद कांबळे, श्रीपती ठोसर, संभाजी साळे, रुख्मिणीताई नन्नवरे, भारत चिंधे, देवराम तुपे, रामदास सातपुते, विलास जतकर, नानासाहेब शिंदे, मिनाताई नन्नवरे, भाऊसाहेब आंबेडकर, विक्रम गुजर, संजय सोनवणे, अभिमन्यू चव्हाण, संजय कांबळे, मिनाक्षी साळवे, रंगनाथ तेलोरे, कॉ. नानासाहेब कदम, पाराजी साळे, पांडुरंग पाखरे, वसंत देशमुख, लताताई वाघमारे, डॉ. रमाकांत जाधव, गंगाराम साळवे, तुळशिराम गोरे, बाळासाहेब दळवी, भास्कर सोनवणे, मिनलताई माने आदी परिश्रम घेत आले. अधिक माहितीसाठी अरुण गाडेकर 9422335736, रुख्मिणी नन्नवरे 9881811047 यांना संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.