देऊळगाव सिद्धीत ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी

केडगाव येथील साई स्पर्श सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल व झरेकर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने देऊळगाव , सिद्धी (ता. नगर) येथील ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.  शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अभिलाष घिगे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी  दादाभाऊ चितळकर, पी.एस. बोरकर, दादा बोठे, नानासाहेब बोरकर, मधुमेह व हृदयरोग तज्ञडॉ. परमेश्‍वर काळे, स्त्री रोग तज्ञ डॉ. शिल्पा पाठक, अस्थिरोग तज्ञ डॉ. रोहन धोत्रे, फिजिशियन डॉ. अमोल जाडकर, संतोष राहिंज, राकेश थोरात, नरेंद्र झरेकर, वृषाली शेळके, सोमनाथ वाघ, विरेंद्र लोखंडे आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांची अनेक वर्षापासून रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर घेण्यात येत असल्याचे साई स्पर्श हॉस्पिटलच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. या शिबिरात उच्च रक्तदाब, मधुमेह व हिमोग्लोबीन तपासणी करुन उपस्थितांना निरोगी आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिबार्थींना पुढील उपचारासाठी विशेष सुट देण्यात आली आहे.