सत्तासंघर्ष सुनावणीवरील निकाल

सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी आता थोड्याच  वेळापूर्वी  संपली आहे.

तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी करण्यात आली.

यावेळी दोन्हीही गटांचा जबरदस्त युक्तिवाद  पाहण्यात आला.

सुप्रीम कोर्टाचा निकाल : 

निवडणूक आयोगाच्या निर्णयास स्थगिती देण्यास नकार

सुप्रीम कोर्टातील १६ अपात्र आमदारांच्या याचिकेची सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती द्या, अशी मागणी ठाकरे गटाने या याचिकेत केली. पण सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या निकालास स्थगिती देण्यास  नकार दिला आहे.

बँक अकाउंट आणि मालमत्तेबाबतच्या निर्णयावर स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय.

सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला उत्तर द्या अशी नोटीस पाठवली आहे.

त्यामुळे आमदारांवर व्हीप जारी झाला तर दोन आठवड्यांपर्यंत कोणत्याही कारवाईस स्थगिती देण्यात आली आहे.
या सुनावणी वेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिवसेनेची मालमत्ता आणि बँक अकाउंट शिंदे गट ताब्यात घेऊ शकतो. त्यामुळे स्थगिती द्या, अशी मागणी केली. त्यावर सुप्रीम कोर्टाने केस फक्त चिन्हाची आहे. त्यामुळे यावर स्थगिती देऊ शकत नाही, असं उत्तर दिलं आहे.
शिंदे गट व्हीप जारी करुन आम्हाला अपात्र करु शकते . असा मुद्दा कपिल सिब्बल यांनी मांडला. त्यावर कोर्टाने शिंदे गटाच्या वकिलांना तुम्ही व्हीप जारी करुन अपात्रतेची नोटीस पाठवणार का? असा सवाल विचारला.
सुप्रीम कोर्टाच्या प्रश्नावर शिंदे गटाच्या वकिलांनी व्हीप जारी करुन कुणाला अपात्र करणार नाही, असं म्हटले आहे .

त्यानंतर ठाकरे गटाच्या आमदारांना पुढील दोन आठवड्यांपर्यंत व्हीप जारी करुन अपात्र केलं जाणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं.

तसेच  पक्ष आणि चिन्ह  या प्रकरणावर पुढील दोन आठवड्यांनंतर  सुनावणी होईल आस यावेळी सांगण्यात आल.