पी.ए. इनामदार स्कूलमध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

'लाभले आम्हास भाग्य , बोलतो मराठी... जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी'... 

इकरा एज्युकेशन अ‍ॅण्ड वेलफेअर सोसायटी संचलित मुकुंदनगर येथील पी.ए. इनामदार स्कूलमध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ‘लाभले आम्हास भाग्य , बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी’  या काव्य पंक्तीने कार्यक्रमाची सुरुवात करणात आली .  विद्यार्थ्यांनी मराठीची थोरवी सांगणारे भाषणे सादर केली.
नाटिका व कवितेतून विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा जागर केला. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष अब्दुल रहीम खोकर, प्राचार्य हारून खान, उपप्राचार्या फराना शेख आदींसह शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थिनींनी मराठमोळी वेशभुषा परिधान केली होती . उपप्राचार्या फराना शेख यांनी विद्यार्थ्यांना मराठी राजभाषा दिनाचे महत्त्व सांगून, मातृभाषेची माहिती दिली.
प्राचार्य हारून खान म्हणाले की, मराठी भाषा हा मराष्ट्रातील जनतेचा सांस्कृतिक ठेवा आहे. या मातृभाषेचा न्यूनगंड न बाळगता त्याचा पुरस्कार करण्याची गरज आहे. मराठी राजभाषा दिनी सर्वांना मायमराठीची आठवण येते. विचारांची देवाण-घेवाण व भावना समृध्द असलेल्या या भाषेला वैभवाच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी सर्वांच्या योगदानाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष अब्दुल रहीम खोकर म्हणाले की, शाळेत जागतिक इंग्रजी भाषेतून शिक्षण दिले जात असले, तरी मराठीची गोडवी कमी झालेली नाही. शाळेत मराठी भाषा देखील तेवढ्याच प्रगल्भतेने शिकवली जात आहे. जागतिक भाषेचा स्विकार करताना, प्रादेशिक संस्कृती जपण्यासाठी मातृभाषेचा देखील तेवढाच अभिमान प्रत्येकाला असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.