बोगस व खोटी कागदपत्रे तयार करून शेतकऱ्याच्या राहत्या घरावर तलाठी, मंडळ अधिकारी व सहकारी पतसंस्था यांनी संगनमत करून बोजा चढविण्याचा आरोप – दिलीप राख

बोलेगाव संभाजी नगर ओमकार हाऊसिंग कॉलनी येथील दिलीप मारुती राख हे शेतकरी असून त्यांच्या राहत्या घरावर बोगस व खोटी कागदपत्रे तयार करून त्याआधारे तलाठी ज्ञानदेव हनुमंत बेल्हेंकर, मंडळ अधिकारी श्रीनिवास रंगनाथ आव्हाड व व्यवस्थापक लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्था यांनी संगनमत करून बोजा चढविला असून 14 डिसेंबर 2020 पासून ते 26 जुलै 2021 पर्यंत दिलेल्या अर्जावर कोणत्याही प्रकारची कारवाई अथवा चौकशी झालेली नसल्याने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबीयांसमवेत आमरण उपोषण करताना दिलीप मारुती राख, शारदा दिलीप राख समवे रामदास वागस्कर, रविंद्र वाबळे, दत्तात्रेय वामन, कैलास डहाळे, शिरीष आजबे, पोपट कराळे आदी उपस्थित होते.

घरावर जे बोगस नोंद करण्यात आली आहे त्याबाबत अर्ज व तक्रारी केल्या आहेत याबाबत सर्व पत्रव्यवहार आपल्या कार्यालयाच्या रेकॉर्डवर आहे वास्तविक सदरची नोंद ज्या कागदपत्राच्या आधारे केली आहे ती सर्व खोटी व बोगस कागदपत्रे आहेत याबाबत चौकशी करून मला योग्य तो न्याय द्यावा यासाठी वारंवार प्रयत्न केले परंतु कार्यालयाकडून मला वरील प्रमाणे फक्त पत्र पाठविण्यात आले परंतु कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आलेली नाही त्यामुळे माहितीचा अहवाल देखील देण्यात आलेला नाही उलट तलाठी कार्यालय तहसीलदार मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयात मला मानसिक त्रास होईल अशा प्रकारची तुच्छ वागणूक देण्यात आलेली आहे.   सदर प्रकरणी कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अमरण उपोषण करण्यात आले आहे तरी येत्या 15 दिवसात कारवाई करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.