भैरवनाथ यात्रेनिमित्त वाळवणे येथे रंगला कुस्त्यांचा हंगामा…

दोन्ही मल्लांचा रोख बक्षिस देऊन अभिनंदन:

अहमदनगर: मेट्रो न्यूज 

वाळवणे  (ता. पारनेर)  येथे भैरवनाथ यात्रेनिमित्त पैलवानांच्या कुस्त्यांचा हंगामा रंगला होता. या कुस्ती हंगाम्यात निमगाव वाघा पै. संदिप डोंगरे विरुध्द काकणेवाडी (ता. पारनेर) चे पै. सार्थक वाळुंज यांची कुस्ती प्रेक्षणीय ठरली.

यांच्यामधील कुस्ती  दहा ते पंधरा मिनीट रंगली होती.दोन्ही मल्ल तुल्यबळ असल्याने डाव-प्रतिडावानंतरही ही कुस्ती अनिर्णित राहिली. दोन्ही मल्लांची कुस्ती ग्रामस्थांनी बरोबरीत सोडवून प्रेक्षणीय कुस्ती केल्याबद्दल दोन्ही मल्लांचा रोख बक्षिस देऊन अभिनंदन केले.

खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तालिम कुस्तीगीर संघाची स्थापना करण्यात आली होती. यावेळी पंच संतोष पठारे, सागर पठारे, सदाशीव पठारे, रामदास काळे, पै. आकाश पठारे, पै. सचिन पठारे, पै. गणेश फलके, पै. सोनू डोंगरे आदी उपस्थित होते.