महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने अभिवादन

अहमदनगर:मेट्रो न्यूज 

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 196 व्या जयंतीनिमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, नगरसेवक प्रकाश भागानगरे, बजरंग भुतारे, विष्णू म्हस्के, ओबीसी सेलचे अमित खामकर, व्यापार व उद्योग सेलचे अनंत गारदे, राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंंजि. केतन क्षीरसागर, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, प्रा. भगवान काटे, भिंगार अर्बन बँकेचे संचालक कैलास खरपुडे, डॉ. रणजीत सत्रे, केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, गणेश बोरुडे, मारुती पवार, अमोल कांडेकर, रेणुका पुंड, सोनाली सोनसळे, रामदास फुले, लहू कराळे, आनंद पुंड, मळू गाडळकर, निलेश हिंगे, सोमनाथ गाडळकर आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले की, येणार्‍या काळात माळीवाडा येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा एकत्रित पूर्ण कृती पुतळा उभारून सुशोभीकरणाचे काम करण्यात येणार आहे. महापालिका स्तरावर त्याचे नियोजन सुरु आहे. या पुतळ्याच्या माध्यमातून फुले दांम्पत्यांनी केलेल्या कार्याची प्रेरणा मिळणार असून, त्यांचे विचार आजही सर्व समाजासाठी दीपस्तंभा प्रमाणे असल्याचे त्यांनी सांगितले.