मच्छीमार व्यवसाय करणाऱ्यांना ग्रामपंचायतीचा ठेका देण्यास नकार
पारनेर येथील अपधूप पांजर तलाव येथील आदिवासी भिल्ल समाजाचे सात ते आठ कुटुंबीय अनेक वर्षापासून या पांझर तलावात बीज सोडून मच्छीमार व्यवसाय करून उपजीविका करत आहेत.
गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आमच्या अन्नात माती कालवण्याचे काम जाणीवपूर्वक केलेले आहे . मच्छी बीज पाण्यात सोडू पर्यंत गप्प राहिले व बीज सोडल्यानंतर तलाव आम्हाला भाडेतत्त्वावर देण्यास नकार देऊन, जातीय वाचक शब्द वापरून आमचा अपमान करीत आहे. गावातील अशा चांगल्या माणसांनी मनगटशाहीचा उपयोग करून तळे पांझर तलाव आम्हाला न दिल्यास आम्ही आदिवासी कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येईल .
ग्रामपंचायत च्या माध्यमातून मच्छीमारचा ठेका आम्हाला देण्यात यावा . आम्ही वेळोवेळी तलावाचे ग्रामपंचायत मध्ये भाडे भरतो पाण्याचे राखण करतो .सर्व नियमाचे पालन करतो,त्यामुळे आम्हाला योग्य ते न्याय मिळावा अन्यथा आदिवासी भिल्ल समाजाच्या वतीने आंदोलने व रस्ता रोको उपोषणे केली जाईल , असे मच्छीमार व्यवसाय करणार्या लोकांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देताना म्हंटले आहे.
यावेळी , संपत कोंडीबा पवार समवेत अहमदनगर जिल्हा भिल्ल असिएशनचे अध्यक्ष सुनील ठाकरे, माणिक वाघ, अशोक माळी, प्रकाश पवार, साहेबराव शिंदे, संतोष पवार, बापू पवार, भाऊसाहेब माळी, बाळासाहेब नेटके, गणपत बर्डे, भाऊसाहेब गांगुर्डे, विकास पवार, नवनाथ पवार, बाळू बर्डे आदी सह मच्छिमार उपस्थित होते.