महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेचे श्रीरामपूरला मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. २० फेब्रुवारी) श्रीरामपूरला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्यात पेन्शनधारकांना किचकट असलेल्या हायर पेन्शनचा ऑनलाइन फॉर्म कसा भरावा? यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील पेन्शनधारकांचा सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
श्रीरामपूर नगरपरिषद टिळक वाचनालयाच्या हॉलमध्ये सकाळी ११ वा. या मेळाव्याला प्रारंभ होणार आहे. या मेळाव्यासाठी उपाध्यक्ष ज्ञानदेव आहेर, बाबासाहेब गाढे, अंकुश पवार, चिटणीस भागिनाथ काळे, खजिनदार अशोक पवार, चिटणीस बाळासाहेब चव्हाण, आबासाहेब सोनवणे, अशोक पाटील आदी पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.