केडगावच्या हरिनाम सप्ताहात हजारो भाविकांच्या उपस्थितीत रंगला इंदोरीकर महाराजांचे किर्तन

हजारो भाविकांच्या उपस्थितीत रंगले इंदोरीकर महाराजांचे किर्तन

केडगाव उदयनराजेनगर येथे ‘श्री विश्‍वेश्‍वर’ प्रतिष्ठानच्या वतीने,  महाशिवरात्रीनिमित्त  अखंड हरिनाम सप्ताह  मध्ये इंदोरीकर महाराजांचे किर्तनाचे आयोजन  करण्यात आले होते.

 एवढं कोणासाठी जगता? आयुष्यभर पाप करून इस्टेट कमवायची ,  मग देह गेल्यावर कमावलं काय?… त्यामुळे देहाला सांभाळा देह गेल्यावर आपल्याला कोणीच विचारणार नाही. तीन वर्षाच्या मुलाला बापाच्या पिंडाला तेल व्हावे लागते ही दारुमुळे निर्माण झालेली शोकांतिका आहे. दारूमुळे संसार उध्वस्त होत असल्याचे भाष्य करुन, तीव्र शब्दात  ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी व्यसनाच्या आहारी जाणार्‍यांचा चांगलाच  समाचार घेतला.
 त्याचप्रमाणे ,दारुच्या आहारी गेलेल्या , कर्ता पुरुषाच्या कुटुंबातील , दाहक वास्तवता मांडली.  तर , दारू पिणार्‍यांनी, पाजणार्‍यांनी व सवय लावणार्‍यांनी भानावर येण्याचे सांगितले. आजच्या कुटुंबव्यवस्थेवर बोलताना आजी आपल्या नातवाला मांडीवर खेळवू शकत नाही,  मुली लायकी नसलेल्या मुलांच्या प्रेमात पडून जीवन उध्वस्त करत असल्याचे  इंदोरीकर महाराज  यांनी आपल्या किर्तनातून परखड मत मांडले.
ह.भ.प. महेश महाराज मडके व प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या या सप्ताहाला प्रमुख पाहुणे म्हणून सुरेखा भानुदास कोतकर उपस्थित होत्या.
सप्ताह कमिटीच्या वतीने इंदोरीकर महाराज  यांचा गुलाब पुष्प आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.