मोबाईल खरेदीवर मिळाले थेट दुबई सहलीचे बक्षिस;
अहमदनगर मोबाईल असोसिएशनच्या वतीने एमआयडीसी सह्याद्री चौक येथील ओम मोबाईल गॅलरी अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्समध्ये दिवाळी व पाडव्यानिमित्त मोबाईल खरेदी केलेल्या ग्राहकांच्या कुपनची सोडत नुकतीच काढण्यात आली. यामध्ये भोसले भाग्यवान विजेते ठरले.भाग्यवान विजेत्यास दुबई सहलीचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. तसेच यावेळी ‘ओप्पो रेनो 8 टी फाईव्ह जी’ मोबाईलचे अनावरण करुन ५१ ग्राहकांना या मोबाईलची विक्रमी विक्री करण्यात आली.
या कार्यक्रमाप्रसंगी ओप्पो कंपनीचे ब्रँच मॅनेजर हर्षल राठी, डिस्ट्रीब्युटर प्रीतम तोडकर, टीम लिडर अक्षय गुप्ता, ओम मोबाईल गॅलरीचे संचालक वैभव भोराडे, संदीप पवार, प्रसाद भवर, शुभम काशीद, अदनान सय्यद, रोहित वाडेकर, रविराज चिट्टयाल आदी उपस्थित होते.
दुबई ट्रिपचे विजेते ग्राहक अभिषेक भोसले यांनी फक्त ८ हजार किंमतीच्या मोबाईलवर दुबई सहलचे बक्षिस मिळत असल्याचा पहिल्यांदा विश्वास बसला नाही, मात्र या बक्षिसामुळे मोठा आनंद होत आहे. परदेशवारीचे स्वप्न साकार होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.