योग-प्राणायामद्वारे जीवनात आनंद व उत्साह; योग गुरु सागर पवार

प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने महिलांसाठी उपक्रम

प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने महिलांच्या निरोगी आरोग्य आणि आनंदी जीवनासाठी योग-प्राणायामबद्दल मार्गदर्शन करताना सुख योगाचे योग गुरु सागर पवार समवेत मनिषा भागानगरे, गितांजली भागानगरे, ग्रुपच्या अध्यक्ष अलकाताई मुंदड, उपाध्यक्षा सविता गांधी, सचिव शोभा पोखर्णा, अनिता काळे, छाया राजपूत, हिरा शहापूरे, शशिकला झरेकर, स्वप्ना शिंगी, साधना भळगट, सुजाता पूजारी, सारिका कासट, जयश्री पुरोहित, उषा गुगळे, दिप्ती मुंदडा आदींसह महिला उपस्थित होत्या.

व्यायामाचा अभाव व तणावपूर्ण जीवनामुळे बहुतेकांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी योग-प्राणायामशिवाय पर्याय नाही. घाम गाळणे म्हणजे योग नव्हे, शास्त्रीय अचूक पध्दतीने योग केल्यास त्याचे निश्‍चित फायदे शरीराला मिळत असल्याचे प्रतिपादन सुख योगाचे योग गुरु ‘सागर पवार’ यांनी केले.
   प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने महिलांच्या निरोगी आरोग्य आणि आनंदी जीवनासाठी योग-प्राणायामबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी योग गुरु पवार बोलत होते. याप्रसंगी मनिषा भागानगरे, गितांजली भागानगरे, ग्रुपच्या अध्यक्ष अलकाताई मुंदड, उपाध्यक्षा सविता गांधी, सचिव शोभा पोखर्णा, अनिता काळे, छाया राजपूत, हिरा शहापूरे, शशिकला झरेकर, स्वप्ना शिंगी, साधना भळगट, सुजाता पूजारी, सारिका कासट, जयश्री पुरोहित, उषा गुगळे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

तणावाने आजाराच्या उंबरठ्यावर असलेल्या व्यक्तीचे इंद्रिय त्याच्या इच्छेप्रमाणे कार्यरत नसतात. इंद्रियांवर ताबा मिळविण्यासाठी प्राणायाम करावा . ध्यानद्वारे विचारांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करता येते. यामुळे नैराश्यपूर्ण जीवन आनंदी बनत असते. तणावामुळे जीवन निरुत्साह व व्याधींनी व्यापले जात आहे.

योग-प्राणायामद्वारे स्वत:ला वेळ दिल्यास जीवनात आनंद व उत्साह निर्माण होऊन निरोगी जीवन जगता येते.  मन शांत नसल्यास चिडचिड होऊन कामात एकाग्रता निर्माण होत नाही. त्यामुळे अनेक कामे व निर्णय चुकत असतात.
कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना महिलांना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. यामुळे कुटुंबातील महिलांचे आरोग्य धोक्यात येते. महिलांना घरातच योग करता यावा या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.