तुर्की आणि सीरिया दुहेरी भूकंपाने हादरले !!

लेबनॉन आणि इस्रायलमध्ये जाणवले 7.8 इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे झटके...

       तुर्की  आणि सीरिया  एकापाठोपाठ एक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरल आहे. तुर्की, सीरियात 40 हून अधिक भूकंपाचे धक्के बसले आहेत. सोमवारी सर्वात जास्त 7.8 तीव्रतेचा भूकंपाचा झटका बसला. यामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला असून हजारो इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. गेल्या २४ तासांत तीन मोठे भूकंपाचे धक्के बसले. एकापाठोपाठ एक झालेल्या भूकंपामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून यात ४ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ हजारापेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत.  अद्यापही बचावकार्य सुरू असून भारतातूनही राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) दोन टीम टर्कीला रवाना झाल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.या भूकंपाचे धक्के तुर्की शेजारील लेबनान, सायप्रस आणि इजिप्तमध्येही जाणवल्याने लोकांमध्ये दहशत पसरली आहे.

पहिला भूकंप – सोमवारी पहाटे चार वाजता तूर्कीमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता ७.८ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली होती. युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्वेने (USGS) दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचं प्रमुख केंद्र गाझियान्टेप या शहरापासून ३३ किलोमीटर अंतरावर, तर नूर्दगी शहरापासून २६ किमी अंतरावर होते. तसेच हा भूकंप जमिनीपासून जवळपास १४.१ किलोमीटर खोलीवर झाला होता.

दुसरा भूकंप – सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्का जाणवल्यानंतर सायंकाळी ५ च्या सुमारास कहरामनमारा प्रांतातील एल्बिस्तान जिल्ह्यात दुसरा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ७.६ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली.

तिसरा भूंकप – दरम्यान, दोन भूकंपाचे धक्का बसल्यानंतर सोमवारी रात्री पुन्हा एकदा टर्कीत भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ६.० रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली.          

     भारतासह अमेरिका, ब्रिटीन,रशिया,जर्मनी,तैवान आदीसह जगभरातील विविध देश, युरोपियन युनियन आणि नाटोने तुर्की सीरियाच्या भूकंपातील पीडितांप्रती दुख व्यक्त करताना मदतीची तयारी दर्शवली आहे. 

     तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या  ट्वीटला  उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नैसर्गिक आपत्ती बद्दल तीव्र दुःख व्यक्त केली. तुर्की मध्ये भूकंपामुळे झालेली जीवीतहानी आणि मालमत्तेच्या नुकसानी बद्दल व्यतीत झालो आहे वृत्तांच्या कुटुंबीयांविषयी माझ्या संवेदना आहेत जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी भारत पूर्वीच्या नागरिकांच्या पाठीशी एकजुटीने उभा असून या आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करायला तयार आहे असे ट्विट मोदींनी केले.
तीन दिवसापूर्वी भूकंपाचे भाकीत करणारे ट्वीट व्हायरल 
     तीन दिवसापूर्वी भूकंपाचे बाबतीत वर्तवणारे ट्विट व्हायरल तुर्की व सीरियात हाहाकार माजवणाऱ्या शक्तिशाली भूकंपाबाबत तीन दिवस अगोदरच भागीत वर्तवण्यात आले होते अशी धक्कादायक बाप समोर आली आहे भूकंप मापनाशी संबंधित संस्थेतील संशोधक फ्रॅंक उबरबिट्स यांनी 3 फेब्रुवारी रोजी या भूकंपाबाबत कल्पना दिली होती त्यांचे यासंबंधीचे ट्विट व्हायरल झाले आहे उगारबेट्स यांनी ट्विट वरून केलेले बाकी जवळपास दोन तो खरे ठरल्यामुळे यावरून जोरदार चर्चा सुरू आहे