रस्त्यावरील बाजार हटविण्याची मागणी

सावेडी उपनगरातील तपोवन रोड ,एकविरा चौक , पाइप लाइन रोड वरील भाजी विक्रेत्यांना रस्त्यावरून तातडीने हटवा अन्यथा पालिकेत घंटानाद आंदोलन करण्यात येईल . असा इशारा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने मंगळवारी निवेदनाद्वारे दिला आहे .
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे यांची भेट घेऊन निवेदन दिले . या वेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे  कि नगर शहरासह पाइप लाइन रोड ,तपोवन रोड ,एकविरा चौक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर भाजी बाजार भरतो , त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे . त्यामुळे छोटे मोठे अपघात होत आहेत . भाजी विक्रेत्यांकडून  शिल्लक राहिलेला भाजीपाला रस्त्यावर टाकला  जातो आहे  . त्यामुळे या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य तयार होऊन दुर्गंधी पसरली आहे . त्यामुळे नागरिकांचा आरोग्याला धोका निर्माण झाला आहे . महापालिका प्रशासनाने ताबडतोब रस्त्यावरील भाजी बाजार हटवा अन्यथा महापालिकेसमोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे . या वेळी  आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटने चे पंकज लोखंडे ,संदीप ठोंबे ,अनिल गायकवाड , शरद महापुरे , संदीप कापडे , संतोष वाघ , महेश गोरे आदी उपस्थित होते.

Attachments area