शहरातील अनेक रस्त्या अंधारात पालिका केव्हा ‘दिवे’ लावणार? स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांच्या संताप; अंधार असलेल्या ठिकाणी दिवे लावण्याच्या सूचना
शहरातील अनेक रस्त्या अंधारात पालिका केव्हा ‘दिवे’ लावणार?
स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांच्या संताप; अंधार असलेल्या ठिकाणी दिवे लावण्याच्या सूचना
अहमदनगर: महापालिकेने शहरात स्मार्ट एलईडी प्रकल्प राबविला मात्र अनेक ठिकाणी अद्याप दिवे बसवण्यात आलेले नाही. बहुतांश ठिकाणचे दिवे बंद अवस्थेतच असल्याने शहरातील रस्त्यांवर अंधार आहे. सदर कंपनीच्या कामाचे त्रयस्थ संस्थेकडून अद्याप परीक्षण बाकी असल्याने पुढील कामे होत नसून, याला महानगरपालिका प्रशासनाची दिरंगाई जबाबदार असल्याचा आरोप स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांनी केला आहे यापुढील कामे तातडीने मार्गी लावून शहरात उजेड करा, अशा सूचना यावेळी प्रशासनाला देण्यात आले. मनपा सोमवारी सभापती गणेश कवडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीचे सभा झाली. सभेला नगरसेवक उपस्थित होते. सभापती कवडे यांनी शहरात बसवण्यात येणाऱ्या महापुरुषांच्या पुतळ्याच्या कामाचा आढावा घेतला. शहरातील मार्केट यार्ड चौकात भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा बसवण्यात येणार आहे. पुतळा बसवण्यासाठी चबुतरा व परिसरात सुशोभीकरण करण्यासाठी समितीने 55 लाख 76 हजार रुपयांच्या निविदा रकमेला मान्यता दिली. नगरसेवक राहुल कांबळे म्हणाले, मार्केट यार्ड चौकात भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व्हावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते पाठपुरावा करत आहे यासाठी वेळोवेळी आंदोलने व बैठका घेतल्या गेल्या या कामात आम्हाला मनापासून सर्व पदाधिकाऱ्यांनी ही साथ दिली