सफाई कामगाराला डांबून ठेवून मारहाण;
राहुरी तालुक्यातील मौजे प्राथमिक आरोग्य केंद्र उंबरे, (ता. राहुरी) येथील सफाई कामगार कर्मचारी राजेश भाऊराव नगरे हे मागील चार वर्षापासुन प्राथमिक आरोग्य केंद्र उंबरे येथे कार्यरत आहेत. यापुर्वी त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यानां आरोग्य केंद्रातील वैदयकिय अधिकारी डॉ. अविनाश जाधव त्यांच्या कामाचा गौरव केलेला आहे.
परंतु मागील आठवडयात दि.६ फेब्रुवारी २०२३ रोजी तेथे कार्यरत वैदयकिय अधिकारी अविनाश वसंत जाधव यांच्या सह आरोग्य केंद्रतील इतर तीन कर्मचा-यांनी राजेश नगरे यास आरोग्य केंद्रातील रूम मध्ये सकाळी १२.०० ते सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत डांबुन ठेवले तसेच त्यांचा मोबाईल घेउन फॉरमेंट केला तसेच त्यांच्या मोबाईलमध्ये संशयास्पद डाटा आहे. असे सांगुन मारहाण करण्यात आली
याप्रकरणी वैदयकिय अधिकारी व इतर तीन कर्मचा-यांवर गुन्हा दाखल केला असुन घडलेला सर्व प्रकार निंदणीय आहे. भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी घटनेतील आरोपींची सखोल तपास करून आरोपींना तात्काळ निलंबीत करावे व चतुर्थ कर्मचा-यास सफाई कामगारास न्याय मिळण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.