पंचशील विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात;

प्राथमिक शाळांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास भविष्यात मराठी शाळा टिकतील -आ. संग्राम जगताप

दा. भि. गायकवाड गुरुजी यांनी स्थापन केलेल्या आजही संस्थेच्या माध्यमातून कष्टकरी कामगारांच्या मुलांना शिक्षणाद्वारे विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम सातत्याने सुरु आहे. वंचित घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी संस्था कटिबध्द आहे. शाळेत डिजिटल स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षणाचे धडे दिले जातात  असे  संस्थेचे अध्यक्ष सुमेध गायकवाड म्हणाले.

वार्षिक स्नेहसंमेलन या कार्यक्रमा प्रसंगी  संदीप थोरात यांनी सादर केलेल्या आई माझी या कवितेतून उपस्थित भारावले.
शाळेतील उपक्रमशील शिक्षक शेखर उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांच्या भारुड, लावणीने उपस्थितांची मने जिंकली. चिमुकल्यांच्या बहारदार नृत्याच्या कलाविष्काराला उपस्थित पालक व प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगला गोसावी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती वांगणे, वंदना शिरसाठ, लुमाजी साबळे, सोनाली तिवारी यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाप्रसंगी आमदार संग्राम जगताप , सह्याद्री मल्टीस्टेट बँकेचे चेअरमन संदीप थोरात, नगरसेविका शीलाताई चव्हाण, सुरेश तिवारी, अजय साळवे, माजी प्राचार्य डी. आर. जाधव, अनिल शेकटकर, डेव्हीड सूर्यवंशी, संस्थेचे अध्यक्ष सुमेध गायकवाड, सेक्रेटरी जयंत गायकवाड, उपाध्यक्ष रत्ना वाघमारे, विश्‍वस्त भिमराव पगारे, रवींद्र कांबळे, सारंग पाटेकर, सोमा शिंदे आदी उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले की, ज्ञान मंदिर समाज घडविण्याचे कार्य करत आहेत. प्राथमिक शाळांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास भविष्यात मराठी माध्यमांच्या शाळा टिकतील व सर्वासामान्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.