सरकारी कर्मचारी खुश जुनी पेन्शन चा मिळणार लाभ

जुन्या पेन्शन बाबत सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला त्यानुसार एक नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार एक नोव्हेंबर 2005 रोजी किंवा किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुना पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे सन 2005 पासून राज्यात नवीन पेन्शन योजना लागू झाली त्यामुळे 2005 नंतर शासकीय सेवेत भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू नये या सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या काळात मोर्चा काढला होता लाभासाठी लगाव लागणारा पर्याय या निर्णयानुसार पात्र ठरणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय शासनाने निर्णय प्रसिद्ध झाल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीत देणे बंधनकारक आहे जे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी ह्या सहा महिन्याच्या कालावधीत जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा पर्याय देणार नाही त्यांना नवी पेन्शन योजना लागू राहील तसेच अधिकारी व कर्मचारी यांना प्रथम दिलेल्या पर्याय अंतिम राहणार आहे