सुपा व्यावसायिकांची पोलीस अधीक्षकांकडे धाव
पोलीस निरीक्षक गोकावे यांचा दबंग व मनमानी कारभार
पारनेर तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन कुमार गोकावे हे गेल्या दोन वर्षापासून सुपा पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे. पदाच्या माध्यमातून ते व्यावसायिकांना त्रास देत आसून व्यवसायिकांना पैशाची मागणी करत असतात.
याबाबतच्या व्यवसायिकांनी तक्रारी ग्रामपंचायतकडे केल्या असून या तक्रारीचा राग मनात ठेवून निरीक्षक गोकावे यांनी व्यवसायिकांना त्रास देण्याची भूमिका सुरूच ठेवली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सुपा ग्रामस्थांनी केली असून या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना देण्यात आले यावेळी ग्रामस्थ योगेश रोकडे, कानिफ पोपटघट, विजय पवार, पप्पू पवार, विलास पवार, जब्बार सय्यद, बाळासाहेब कळमकर, सुरेश काळे, शुभम शिंदे, राजू सोनूळे आदी उपस्थित होते.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वादग्रस्त निरीक्षक गोकावे यांची तात्काळ बदली करावी व व्यवसायिकांना पैशाची मागणी करणे सर्वसामान्य नागरिकांना मारहाण करणे असे आरोप निवेदनाद्वारे करण्यात आले आहे कारवाई न केल्यास येत्या ३ तारखेला सुपा येथे रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.