सेवाप्रीत सोशल फाउंडेशनचा एक आगळावेगळा उपक्रम

अहमदनगर : मेट्रो न्यूज     

सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने लालटाकी भारस्कर कॉलनी येथील स्नेहालय ‘संचलित उत्कर्ष बालभवन’ मधील विद्यार्थ्यांना अभ्यासाठी टेबल व बसण्यासाठी सतरंज्या भेट देण्यात आल्या.महिलांच्या सक्षमीकरण व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्याचे काम या उद्देशाने ही संस्था  कार्य करत असते.

विद्यार्थ्यांना अभ्यासाठी टेबल व बसण्यासाठी सतरंज्या भेट देऊन सेवाप्रीत सोशल फाउंडेशनने एक आगळावेगळा उपक्रम राबविला आहे. या कार्यक्रमासाठी सेवाप्रीतच्या संस्थापक अध्यक्षा जागृती ओबेरॉय, ग्रुप लीडर निशा धुप्पड, डॉ. सिमरन वधवा, अर्चना खंडेलवाल, सविता चड्डा, गीता नय्यर, वीना ओबेरॉय, डॉ. सोनाली वहाडणे, बालभवनच्या समन्वयक रुबिना शेख, सुनिता सोळसकर, संतोष बेदरकर आदी उपस्थित होते.

सेवाप्रीतच्या महिलांनी बालभवन मधील विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे व चॉकलेटचे वाटप करुन त्यांच्याशी संवाद साधला.या उपक्रमासाठी सेवाप्रीतच्या सदस्या नताशा धुप्पड, गीता धुप्पड, वीना ओबेरॉय, वीना खुराणा, रिटा बक्षी, अर्चना ओबेरॉय, डॉ. सोनाली वहाडणे, अंशू कंत्रोड, रविंदर धुप्पड, संगीता अ‍ॅबट, दिशा ओबेरॉय यांचे सहकार्य लाभले. बालभवनच्या विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या उपक्रमाबद्दल रुबिना शेख यांनी आभार मानले.