१५ टक्के लाभांश देण्याची परंपरा कायमः संतोष गांधी
अहमदनगर : सहकारमहर्षी स्वर्गीय सुवालाल गुंदेचा यांनी स्थापन केलेली पतसंस्था दिवसेंदिवस विस्तारत आहेत. सभासद, ठेवीदार, खातेदारांचा विश्वास आणि शिस्तबध्द कारभार यामुळे संस्था मोठी भरारी घेत आहे. संस्थेने उत्कृष्ट आर्थिक कामगिरी केली असून, सभासदांना १५ टक्के लाभांश देण्यात येणार आहे. लाभांशाची परंपरा कायम राखण्यात संस्थेला पुन्हा एकदा यश आले आहे, असे प्रतिपादन पतसंस्थेचे चेअरमन संतोष गांधी यांनी केले. सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच चेअरमन संतोष गांधी यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली. यावेळी व्हाईस चेअरमन समीर बोरा, संचालक मनोज गुंदेचा, अभय पितळे, शैलेश गांधी, चेतन भंडारी, विनित बोरा, ॲड.आनंद फिरोदिया, सुवर्णा डागा, प्रिती बोगावत, पंडितराव खरपुडे, विनय भांड, शरद गोयल, तज्ज्ञ संचालक शांतीलाल गुगळे, सरव्यवस्थापक प्रशांत भंडारी, संस्थेचे कायदेशीर सल्लागार ॲड.मनीष गांधी, ॲड.अतुल गुगळे यांच्यासह सभासद जैन ओसवाल पंचायत सभेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, सीए अशोक पितळे, सुभाष मुथा, राजेंद्र चोपडा, राजेंद्र गांधी, बाळासाहेब भंडारी, रमेश पितळे, संजय भळगट, संजय गुगळे, पुष्पा चानोदिया, कमलेश भंडारी, किरण शिंगी, विलास गांधी आदीसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरव्यवस्थापक प्रशांत भंडारी यांनी विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. सर्व विषयांना सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूरी देण्यात आली. संतोष गांधी म्हणाले, ग्राहकांना घरबसल्या बँकिंग व्यवहार करता येण्यासाठी अद्यावत सॉफ्टवेअर कार्यरत करण्यात आले आह. संस्थेचे आठ हजार ६५० सभासद आहेत. स्थापनेपासून २४ वर्षांच्या वाटचालीत संस्थेला कायम ऑडिट ‘अ’ वर्ग मिळालेला आहे. मार्केटयार्ड शाखा व्यवस्थापक मनोज लुणिया यांनी सूत्रसंचालन केले. समीर बोरा यांनी आभार मानले.