7 crore global award for Solapur teacher

भारताचा झेंडा जगात फडकला

 

सोलापूरच्या परितेवाडी शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांनी भारताचा झेंडा जगात फडकावलाय.  युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार त्यांनी पटकावलाय.   सात कोटी रुपयांचा हा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत.   डिसले यांनी शालेय अभ्यासक्रमांच्या पुस्तकांना ‘क्यूआर कोड’ची जोड देऊन शिक्षणात ‘डिजिटल क्रांती’ करण्याचा प्रयोग केला.’ या प्रयोगाने केवळ महाराष्ट्राच्याच नाही, तर देशाच्या शिक्षण क्षेत्रात क्रांती झाली.  तब्बल ८३ देशांतील विद्यार्थ्यांना ते ऑनलाइन माध्यमाद्वारे विज्ञान शिकवतात.  जगभरातील १४० देशांतील १२ हजारांपेक्षा अधिक शिक्षकांनी या पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर केले होते.   त्यातून दिसले यांची निवड झाली आहे.  हे वृत्त समोर आल्यापासून डिसले यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होतोय.   डिसले यांच्या या यशानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून  स्तुतीसुमनं उधळली आहेत. यावेळी डिसले यांनी पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम या पुरस्कारासाठी अंतिम फेरीत पोहोचलेल्या अन्य नऊ  शिक्षकांना देण्याचे जाहीर केलय.