रोहित पवारांचा भाजप ला टोला!!!! 

भाजपला दाखवून दिली त्यांची ‘जागा’

            शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी पदवीधर शिक्षक मतदार संघाची निवडणूक  एकत्रित लढवल्याने भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे.  औरंगाबादसह, पुणे आणि नागपूर पदवीधर  मतदारसंघही त्यांना  गमवावा लागला आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी ठरलाय.
            विजयानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवरुन महाविकास आघाडीचे अभिनंदन केले आहे, तसेच भाजपलाही जोरदार टोला लगावला आहे. रोहित पवारांनी एक ट्विट केलं आहे, त्यामध्ये म्हटलं आहे की, “भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी महाविकास आघाडीसाठी निष्ठेची होती. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेसह सहयोगी पक्षांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी एकमेकांबद्दल दाखवलेली निष्ठाच आज कामी आली.

                 या निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीची मनातील जागा कायम ठेऊन भाजपला त्यांची ‘जागा’ दाखवून दिली आहे”.“भाजपच्या म्हणवल्या जाणाऱ्या नागपूर, पुण्यासारख्या बुरुजालाही सुरुंग लावत महाविकास आघाडीने विजयाचा झेंडा रोवला आहे. त्यामुळं आता तरी भाजपने खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष म्हणून प्रामाणिकपणे काम करण्यास सुरुवात करायला हरकत नाही”. असे ते म्हणाले आहेत.