कांदा आणि दूधप्रश्नी आंदोलन

लंके यांच्यासह शेतकऱ्यांचा जन आक्रोश

निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव कमी झाले आहेत. दूध दरातील कपातीच्या विरोधात खासदार निलेश लंके महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. पाच जुलै रोजी होणाऱ्या या आंदोलनात अहिल्यानगरच्या सर्व शेतकरी व दूध उत्पादक बांधवांनी सहभागी व्हावे. असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना खासदार लंके यांनी यापूर्वीच निवेदन दिले आहे. आता खासदार लंके 5 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी जनआक्रोश आंदोलन करणार आहे. सध्या कांदा व दुधाला योग्य भाव मिळत मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाल्याचे या निवेदनात म्हटले आहे. खासदार लंके यांनीही निवडणुकीदरम्यान कांदा आणि दूध हजाराचा प्रश्न उपस्थित करत मतदान प्रक्रिया संपताच, आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. कारण त्यांच्या मते, आंदोलनाशिवाय सरकारला जाग येणार नाही.