गाईंच्या बंदोबस्तासाठी इच्छामरणाचा निर्णय

मोढवे ग्रामस्थ करणार राष्ट्रपतींना विनंती

कळपाकडून शेती व्यवस्था उध्वस्त
सोमेश्वरनगर वनविभागाच्या जंगलात राहणाऱ्या सुमारे 100 मोकाट गाईंच्या कळपाने बारामतीतल्या मोढवे गावासह आसपासच्या चार गावातील शेती व्यवस्था अक्षरशः उद्ध्वस्त आहेत. त्यांच्या बंदोबस्तासाठी गेली चार वर्षे वन पशुसंवर्धन, महसूल विभागांसह, आमदार, खासदार, मंत्री यांच्या हातापाया पडून शेतकरी थकले आहेत,मोढवेकरांनी गाईंच्या बंदोबस्तासाठी अकरा लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले असून, यानंतरही प्रश्न न सुटल्यास सोमवारी राज्यपाल व राष्ट्रपतींकडे इच्छा मारण्याची विनंती करण्याचा निर्णय घेतला आहे. जोगवडी, राख, नावळी या गावांमध्ये शंभर मोकाट गाई व वळूनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दिवसभर सात-आठशे एकर वनात हुंदडतात आणि रात्री कळपाने बाहेर पडून शेळके पिके फस्त करतात शेतकरी आधीच जिराईतदार आहेत त्यांच्या त्यांची मका भाजीपाला बाजरी, सोयाबीन, कांदा, गहू, ज्वारी, ऊस पिके शेतात रातोरात फस्त होतात. कोणी रात्रभर राखण करतोय, कोणी कंपाऊंड केले, कुणी शेती सोडून दिली, तर कोणी सालगडी झाले आहेत. एका तरुणास वळूने शिंगावर घेऊन फेकल्याने त्यांना कुणी आडवे जाईना. अशात गोवंशहत्याबंदीचे भयही शेतकऱ्यांना वाटते. वनाधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, तहसीलदार, प्रांत, बीडिओ, सीईओ यांच्या हाता पाया पडून झाले. आमदार, खासदारांच्या, गोप्रेमींच्या विनवण्या करून झाल्या, रास्ता रोकोही केले, मतदानावर बहिष्काराचे अस्त्र उपसले, असंख्य निवेदन दिली, आलेली रेस्क्यू टीमही गायब झाली. आता चालू खरिपात नव्याने पेरलेली पिके गुडघ्याला लागताच, फस्त होऊ लागल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटला आहे. आज मोढवे ग्रामपंचायतच्या मासिक सभेत, लोक वर्गणीतून बक्षीस जाहीर केले आहे. व राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री यांना इच्छा मरण ची परवानगी मागण्याचा दुर्दैवी निर्णयही घेतला आहे. दरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर या संदर्भात म्हणाल्या की, गाई वन्यप्राणी संवर्गात येत नाही. तरीही वरिष्ठांशी बोलून रेस्क्यू टीमला कळवलेले आहे.