बालभारतीकडून यंदा लार्ज प्रिंट पुस्तके उपलब्ध आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वाटप

लहान वयात नजर कमजोर मोठ्या अक्षरांचे पुस्तक शाळेत उपलब्ध

बाल वयात नजर कमजोर असल्यास वाचण्यासाठी त्रास होतो. त्यामुळे बालभारतीने यंदा लार्ज प्रिंट हा प्रयोग केला आहे. दृष्टी अधू असलेल्या मुलांना शाळेतून ही मोफत पुस्तक वाटप करण्यात आली आहे. नगर जिल्ह्यात असे चारशे चार विद्यार्थी असून त्यांना शिक्षण विभागाकडून ही पुस्तके वितरित झाली आहे. हल्ली मोबाईलचा अति वापर त्यासोबत जीवनसत्वांची कमतरता यामुळे बालवयातच मुलांची नजर कमजोर होत आहे. अशा मुलांना वाचण्यासाठी त्रास होऊन शिक्षणात अडथळात अडथळा येऊ नये. यासाठी बालभारतीने यंदा लार्ज प्रिंट पुस्तकांचा प्रयोग केला आहे. अंशतः अंध असलेल्या जिल्ह्यातील 4004 विद्यार्थ्यांनाही पाठ्यपुस्तके शाळेतून मोफत मिळालेली आहेत. समग्र शिक्षा अभियानातून दरवर्षी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मोफत दिली जातात. परंतु दृष्टी कमजोर असलेल्या मुलांसाठी यातील अक्षरे वाचणे त्रासदायक ठरते. त्यामुळे अधू दृष्टीचे बालक हुशार असूनही अभ्यासात मागे पडण्याचा धोका निर्माण होतो. त्यांच्यासाठी या लार्ज प्रिंटचा हा प्रयोग केला गेला आहे. या पुस्तकात आणि सामान्य विद्यार्थ्यांच्या पुस्तकातिल अभ्यासक्रम घटकांची क्रमवारी सारखीच आहे. परंतु या पुस्तकात अक्षरे दुप्पट मोठ्या आकाराची ठळक आणि सहज वाचता येतील अशी आहे. त्यामुळे नजर कमजोर असलेल्या विद्यार्थ्यांनाही ही पुस्तके सहज वाचता येतात. नियमित विद्यार्थ्यांना ए फोर चा अंशतः विद्यार्थ्यांसाठी तीच पुस्तके येथील म्हणजे अडीच पट आकाराची आहेत.