अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यासाठी 21जुलैपर्यंत वाढ
अहमदनगर : शहरातील पत्रकार चौक ते डीएसपी चौक रस्त्याचे काँक्रिटीकरण व शनिशिंगणापूर फाटा ते राहुरी दरम्यान महामार्गांची दुरुस्ती सुरू आहे. त्यामुळे नगर-मनमाड महामार्गावरील अवजड वाहतूक 17 जुलैपर्यंत पर्यायी मार्गाने वळवली होती. आता ही मुदत 21 जुलै पर्यंत वाढवण्यात आली आहे. पत्रकार चौक ते डीएसपी चौकादरम्यान रस्त्याचे काँक्रिटीकरण शनिशिंगणापूर फाटा ते राहुरी दरम्यान महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. सध्या या महामार्गाने पंढरपूरला वारकरी जात आहे. अवजड वाहनांच दिंडीतील भाविकांना धक्का लागून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी बायपास ते पुणतांबा फाट्यापर्यंत अवजड वाहतूक 21 जुलैपर्यंत पर्यायी मार्गाने वळवण्याचे आदेश दिले आहेत. नगरहून मनमाडकडे जाणारी अवजड वाहतूक विळत बायपास, शेंडी बायपासमार्गे, नेवासे, कायगाव, गंगापूर, वैजापूर, येवलामार्गे मनमाडकडे किंवा केडगाव बायपास, कल्याण बायपास, आळेफाटा, संगमनेरमार्गे, नाशिककडे जाईल. शनिशिंगणापूरहून जाणारी वाहने संभाजीनगर मार्गावरून देहरे राहुरी कृषी विद्यापीठा मार्गे मनमाड कडे किंवा खेडगाव बायपास कल्याण बायपास आळेफाटा संगमनेर मार्गे नाशिक कडे, शनिशिंगणापूरहून जाणारी वाहने संभाजीनगर मार्गावरून देहरे, राहुरी कृषी विद्यापीठामार्गे, मनमाडकडे जातील. शनिशिंगणापूरहून सोनई, राहुरीमार्गे मनमाडकडे जाणारी अवजड वाहने नगर छत्रपती संभाजी नगर महामार्गावरून देहरे, राहुरी कृषी विद्यापीठ, राहुरी कडून मनमाडकडे अवजड वाहने श्रीरामपूर, बाभळेश्वर, निर्मळ, पिंपळी बायपासमार्गे, कोपरगाव, येवला, मनमाडकडे जातील.