नगर मधील बर्ड्स हाऊस मध्ये गोळीबार तिघे ताब्यात

पोलिसांकडून चौकशी सुरू

अहमदनगर : नगर शहरातील फिश अँड बर्ड्स हाऊसमध्ये बुधवारी संध्याकाळी 6:00 च्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. कारण अद्याप समजू शकलेले नाही. सिराज दौलत खान, राजेंद्र देविदास बहुधने आणि प्रदीप कुमार तुपेरे या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. येथील मार्केट यार्ड चौकात एक फिश अँड बर्ड्स नावाचे पक्ष विक्रीचे दुकान आहे. या दुकानात गोळीबाराचा प्रकार घडला. यावेळी दुकानात पाच जण हजर होते. घटनेची माहिती मिळताच, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या सहपथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी गावठी कट्टा व काडतूस मिळून आले. पोलिसांनी ते ताब्यात घेतले. यातील एक डॉक्टर आहे. त्यांना दुकानात बोलावून घेतल्यानंतर हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. उर्वरित दोन जणांना ताब्यात घेतल्यानंतर या घटनेचा उलगडा होईल. कुणी कुणावर गोळीबार केला? यासाठी कोणाची मदत घेतली गेली? त्यांच्या आपापसात पूर्वीचे काही वाद आहेत का? याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत.