माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरण्यासाठी सोळा ठिकाणी सुविधा उपलब्ध

अहमदनगर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महापालिकेच्या चारही प्रभाग समिती कार्यालयांसह शहरात 16 ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरात 12 व 13 जुलै रोजी विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. मात्र महिलांना ऑनलाईन अर्ज भरणे व ऑफलाइन अर्ज वितरण अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. दोन दिवस विशेष मोहिमेनंतरही या 16 ठिकाणी योजनेचे कामकाज चालू राहणार आहे. प्रभाग कार्यालयासहभूत करवाडी शाळा, मनपा शाळा क्रमांक 17, नागपूर उपकार्यालय, माळीवाडा कार्यालय, सहमाहिती सुविधा केंद्र, महात्मा फुले दवाखाना, तोफखाना दवाखाना, झेंडीगेट आरोग्य केंद्र, मुकुंद नगर, आरोग्य केंद्र बुरुड गाव कार्यालयासह केडगाव उपकार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, मनपा शाळा क्रमांक चार, मनपा शाळा ओंकार नगर या ठिकाणी या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे.