आषाढी वारीनिमित्त धावणार 240 बस

उद्यापासून 22 जुलै पर्यंत बस उपलब्ध, सर्व आगारातील बसेस तारापूरहून सुटणार

नगर : आषाढी एकादशी निमित्त एसटी महामंडळाच्या अहमदनगर विभागाने 240 जादा बसचे नियोजन आखले आहे. या बस 13 जुलै ते 22 जुलै या कालावधीत उपलब्ध असणार आहे. सर्व आगारातील बस नगर शहरातील तारकपूर बस स्थानकातून सुटणार आहे. तसेच परतीच्या प्रवासासाठी पंढरपूर येथील विठ्ठल कारखाना स्थानकातून सुटतील. अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली. आषाढी पंढरपूर यात्रेनिमित्त एसटीकडून जादा प्रवासी वाहतुकीचे नियोजन आखण्यात आले आहे. पंढरपूर यात्रेसाठी जाणारी कोणतीही बस माळीवाडा स्थानकातून नव्हे तर तारकपूर बसस्थानकातून सुटतील.