डॉ. ला धमकवण्यासाठी सिराजने, राजेंद्र वर झाडली गोळी
माळीवाडा गोळीबार प्रकरणात ट्विस्ट, तिघांवर गुन्हा दाखल
नगर : शहरातील एका डॉक्टरला ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याच्या उद्देशाने डॉक्टर आणि त्यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कामकाराचे अपहरण केले. त्यांना घाबरवण्यासाठी बंदुकीतून गोळीबार केला आणि नंतर आपल्याकडेच गोळीबार झाल्याचा बनाव करत सिराज खान यांनी दिशाभूल केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. संशयीतांसह तिघांची हॅन्डवॉश करून तपासणी करत कोतवाली पोलिसांनी हा बनाव उघड केला. आणि सिराजला गजाआड केले. बनाव उघड झाल्यावर सुरुवातीला संशयित असलेला राजेंद्र बहुधने अखेर फिर्यादी झाला आहे. त्याच्या फिर्यादीवरून सिराज दौलत खान, त्याचा मुलगा अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सिराज याला अटक करण्यात आली असून, त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळी मार्केट यार्ड चौक रस्त्यावर एका दुकानात गोळीबार झाला होता. यात सुरुवातीला सिराज त्याच्यावर राजेंद्र यांनी गोळीबार केल्याचा बनाव केला. तशी माहिती पोलिसांना देत घटनास्थळी असलेल्या डॉ. प्रदीप तुपेरे यांनही धमकावत तसेच सांगण्यास भाग पाडले. चौकशीत पोलिसांना संशय आल्यावर त्यांनी तपासणी केली आणि हा बनाव उघड केला. राजेंद्र बहुधने हा पूर्वी डॉ. तुपेरे यांच्या नवोदय हॉस्पिटलमध्ये कामाला होता. आरोपी सिराज खान आणि राजेंद्र यांच्यावर काही वर्षांपूर्वी अतिक्रमण काढण्यावरून गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून सिराज हा तुपेरे यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळत होता. त्यांनी पैसे देणे बंद केल्याने पुन्हा भीती दाखवून पैसे उकळण्यासाठी सिराजने हा डाव आखला. राजेंद्रला बस स्थानकातून बळजबरीने त्याच्या कारमध्ये बसवून तुपेरे यांच्या हॉस्पिटलमध्ये नेले. तेथून तुपे यांना घेऊन दोघांना स्वतःच्या दुकानात आणले होते. राजेंद्रला मारहाण करून सिराजने त्याच्यावर गोळी झाडत नाटक करत ही गोळी जमिनीवर फायर केली. तीच बंदूक राजेंद्रच्या हातात देऊन यांना पोलीस आल्यावर राजेंद्र यांनीच माझ्यावर गोळीबार केल्याचे सांगायचे आस दम दिला. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आले. डॉ. यांनी सिराज खानने सांगितल्यानुसार पोलिसांन जबाब देण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसांना संशय आल्याने तपासणी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यातून नवीन ट्विस्ट सर्वांसमोर आला.