नगरमध्ये 20 व 21 जुलै रोजी राज्यस्तरीय कथाकथन व काव्य वाचन स्पर्धा

अहमदनगर : बॅक स्टेज आर्टिस्ट असोसिएशन तर्फे आंतर शालेय कथाकथन स्पर्धा व २१ जुलै रोजी स्व. मनीष कुलकर्णी स्मृती राज्यस्तरीय खुल्या व लिखित मराठी काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 21 जुलै रोजी या स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 21 जुलै रोजी रावसाहेब पटवर्धन सभागृहात होणार आहे. यावेळी अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. स्पर्धेसाठी 17 जुलैपर्यंत नोंदणी करण्यात येऊ शकते.