शहरात महानगरपालिकेने बंद पडलेले स्वच्छता अभियान पुन्हा सुरू करावे

नगर : लोकसहभागातून महापालिकेच्या माध्यमातून नगर शहरात मनपा स्वच्छता अभियान दर महिन्याच्या 30 तारखेला सुरू करण्यात आले होते. या माध्यमातून शहरात वेगवेगळ्या भागांमध्ये नागरिकांसमवेत स्वच्छता करण्यात येत होती. या माध्यमातून जनजागृती करत, स्वच्छतेचे महत्त्व समाजामध्ये पटवून देण्याचे काम केले जात होते. मात्र महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्यानंतर पालिकेवर प्रशासक नेमण्यात आल्यानंतर महापालिकेची सुरू असलेले स्वच्छता अभियान मात्र बंद झाले. तरी महापालिकेने पुन्हा शहरात मनपाचे स्वच्छता अभियान सुरू करावे. अशी मागणी आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी केली आहे.