रेबीज इंजेक्शन घेतल्यानंतर वर्षभर रक्तदान न करण्याचा तज्ञांचा इशारा
अहमदनगर : रक्तदान करताना आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे. कारण निरोगी रक्त असेल तर रुग्णाला दिले जाते. म्हणून रक्तदान करतानाही काळजी घ्यायला हवी. असे तज्ञांचे मत आहेत. रक्तदान करताना दात्यांनी कोणतीही गोष्ट न लपवता रक्तदान करणे गरजेचे असते. त्यामुळे रक्तदान शिबिरात डॉक्टरांची उपस्थिती असणे हे महत्त्वाचे असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. तरी रक्तदान करण्यापूर्वी रक्तदात्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यामध्ये तीन दिवस अगोदर प्रतीजैविके घेतलेली नसावीत, रक्तदान करण्यापूर्वी तीन महिन्यात मलेरिया झालेला नसावा, वर्षभरात विश्वमज्वर झालेला नसावा, अमली पदार्थांचे सेवन केलेले नको, याशिवाय रक्तदान करण्याआधी 15 दिवस कॉलरा, टायफाईड, प्लेगची लस घेतलेली नको. याशिवाय 18 ते 65 वय वर्ष पूर्ण असलेल्या व्यक्ती स्वच्छेने रक्तदान करू शकतात. मात्र यासाठी रक्तदात्याचे योग्य वजन असणे गरजेचे आहे म्हणजे कमीत कमी 45 किलोच्या वर रक्तदात्याचे वजन असावे या वयोगटाच्या दरम्यान आपले शरीर रक्तदान केले तरी पुन्हा ते भरून काढू शकेल तसेच योग्य प्रकारे रक्त तयार करू शकते त्यामुळे रक्तदान करण्याचे आवाहन नगर शहरातील रक्तपिढ्यांनी दात्यांना केले आहे
45 किलो वजना बरोबरच हिमोग्लोबिन हे 12 टक्क्यांच्या पुढे व वजन हे 45 किलोच्या पुढे असायला हवे. काही वेळेस हिमोग्लोबिन जर प्रमाणापेक्षा जास्त असेल तरीही आपण रक्तदान करून उपयोग होत नाही. इतकेच नव्हे तर एचआयव्ही किंवा इतर काही आजार असल्यास रक्त घेतले जात नाही. अशा व्यक्तींनी रक्तदान केलेच तरी त्याची पुढे तपासणी होऊन ते नष्ट केले जाते.