लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 90 हजार अर्ज पात्र
अहमदनगर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत महिलांकडून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातून आजपर्यंत सात लाख महिला लाभार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन भरून घेण्यात आले. गुरुवारपासून तालुकास्तरावर सुरू केलेल्या छाननी पक्षातून दोन दिवसात 90 हजार महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत. 8628 महिलांच्या अर्जात काही त्रुटीने निघाल्या आहेत. योजनेच्या अर्जाची छाननी जलद गतीने व्हावी. यासाठी तालुकास्तरावर स्वतंत्र कक्ष सुरू केले गेले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत सात लाखाहून अधिक ऑनलाईन अर्ज केले गेले. या अर्जाची तपासणी सध्या सुरू आहे. अर्ज पडताळणी प्रक्रियेत काही त्रुटी आढळून आल्यास पूर्ततेसाठी लाभार्थी महिलांना मोबाईलवर संदेश पाठवण्यात येत आहे. असे संदेश प्राप्त होताच संबंधित महिलांनी त्रुटींची पूर्तता करणे गरजेचे आहे. नारीशक्ती अॅप द्वारे ही दुरुस्ती सहज करता येणार आहे. अर्ज दुरुस्त करण्याची संधी एकदाच मिळणार आहे.