शेतकऱ्यांना फवारणी पंपासाठी महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन

अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट

अहमदनगर : शेतकऱ्यांना पिकांवर फवारणीसाठी पंप हवा असेल तर महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा. असे आवाहन जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे. कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीकपद्धतीला चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी तसेच कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया पिकातील मूल्य साखळीला चालना देण्याच्या उद्देशाने विशेष कृती योजना 2022-23 ते 2024-25 या तीन वर्षात राबवण्यात येत आहे. 2024-25 मध्ये या योजनेअंतर्गत चालू खरीप हंगामामध्ये 100% अनुदानावर निविष्ठा पुरवण्यात येणार आहे. यामध्ये बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 6 ऑगस्टपर्यंत, तसेच कापूस साठवून साठवणूक बॅगेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट आहे. हे 100% अनुदानावर दिले जाणार आहे. यासाठी लाभार्थ्यांची निवड, महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून, ऑनलाईन पद्धतीनेच करण्यात येणार आहे. तरीही जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवर अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बोराळे यांनी केले आहे.