बिकट परिस्थिताशी लढत विशाल भालसिंग जिद्दीने बनला कालवा निरीक्षक
अहमदनगर (प्रतिनिधी)- घरची परिस्थिती हलाखीची त्यातच नियतिच चक्र फिरल , वडिलांच आधाराच छत्र हरपल . वडिलांच निधन झाल्याने मनावर झालेला आघाद , दुःखाला हिंमतीने सामोरे जात , नाजुक परिस्थितीचा सामना करत विशाल भालसिंग यांनी जिद्दीच्या बळावर जलसंपदा विभागात कालवा निरीक्षक पदाला गवसणी घातली .
नगर तालुक्यातील वाळकी येथील अतिशय गरीब कुंटुंबातील विशाल गंगाधर भालसिंग यांनी शिक्षणातील अनेक अडीअडचणी वर मात करत
पुण्यातील सर परषूरामभाऊ महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले .
त्यानंतर महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण होत पहिल्याच प्रयत्नात जलसंपदा विभागात कालवा निरीक्षक पदाला गवसणी घातली . अतिशय मेहनत, चिकाटी व जिद्दीच्या बळावर विशालने हे यश प्राप्त केले . या यशाबद्दल .
स्तरांतून त्यांचे कौतूक होत आहे .
विशाल भालसिंग यांची जलसंपदा विभागात कालवा निरीक्षक पदी निवड झाल्याने वाळकी ग्रामस्थांच्या वतीने निसर्ग मित्र तथा सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी सन्मान केला . यावेळी पत्रकार ज्ञानदेव गोरे , जेष्ट व्यापारी पंडीत आप्पा बोठे , नाथा खेडकर , मंगेश कासार, विष्णू बोठे , संजय खांदवे , अनिलराव बोठे , शिवराम धोत्रे , जालींदर जाधव , देवा लोखंडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते .