ग्रंथमित्र पुरस्काराने अमोल इथापे सपत्नीक सन्मानित

मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण विभाग मंत्रालय, ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांच्या वतीने डाॅ.शि.रा.रंगनाथन ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र) विभागस्तरीय सन 2022 – 23 चा पुरस्कार आज अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे ग्रंथपाल अमोल संभाजी इथापे यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.ना.चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते दि.20 ऑगस्ट 2024 रोजी महिला विद्यापीठ एस.एन.डी.टी मुंबई येथे संपन्न झाला.पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात केले.यावेळी व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव मा.विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव मा.प्रताप लुबाळ साहेब, राज्यसभेचे माजी खासदार, लेखक,पत्रकार कुमार केतकर, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मा.डाॅ.गजानन कोटेवार, ग्रंथालय संचालक मा.अशोक गाडेकर सहा ग्रंथालय संचालक सचिन जोपुळे (नाशिक), सहा ग्रंथालय संचालक सूनील हूसे (औरंगाबाद) अनिल बाविस्कर अधीक्षक,श्री.संजय डाडर (मुंबई) जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे निरीक्षक रामदास शिंदे ग्रंथालय संचालनालयातील सर्व अधिकारी, सर्व जिल्ह्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी,सर्व विभागाचे पदाधिकारी,ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते, मोठ्या संख्येत उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते अमोल इथापे आणि प्रा.सौ सविता अमोल इथापे यांनी हा बहुमान स्वीकारला.
या बहुमाना बद्दल वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड,उपाध्यक्ष दिलीप पांढरे, अंनत देसाई, खजिनदार तन्वीर खान, संचालक वैद्य राजा ठाकूर, अनिल लोखंडे, प्रा मेधा काळे, किरण आगरवाल,अजित रेखी,शिल्पा रसाळ, प्रो.ज्योती कुलकर्णी,संजय चोपडा, डॉ. शैलेद्र पाटणकर, चंद्रकांत पालवे,गौरी जोशी,
यांनी अभिनंदन केले आहे.
यावेळी अक्षदा, प्रगती इथापे,सहा. ग्रंथपाल नितील भारताल,संजय गाडेकर,संकेत फाटक,पल्लवी कुक्कडवाल, वर्षा जोशी,निखिल ढाकणे आदी उपस्थित होते.