भारतीय सिंधू सभाच्या वतीने रक्षाबंधन : बालघरच्या निराधार मुलांसमवेत साजरी

नगर- येथील सामाजिक संस्था भारतीय सिंधू सभा च्या वतीने रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सावेडीतील सतनाम साक्षी गोशाळेत आयोजित कार्यक्रमात बालघर प्रकल्प या संस्थेतील अनाथ निराधार मुला मुलीं समवेत रक्षाबंधन साजरा केला यावेळी पालघर प्रकल्पाच्या मुलांना सिंधी समाजाच्या भगिनींनी राखी बांधली व बालघर च्या मुलींनी सभेच्या कार्यकर्त्यांना व समाज बांधवांना राखी बांधत रक्षाबंधन साजरा केला. याप्रसंगी मुलांना अनेकांनी रोख स्वरूपात ओवाळनी दिली तसेच संस्थेच्या वतीने व समाजातील दानशुरांच्या वतीने त्यांना शालोपयोगी साहित्य, खेळणी तसेच जीवनावश्यक वस्तू, किराणा आदी साहित्य दिल्यामुळे मुलांच्या चेहर्‍यावर हसू उमटले तसेच मिष्टान्न जेवण व आदारातिथ्याने मुले भारावुन गेली होती. मुलांच्या वतीने त्यांच्या समवेत आलेल्या शिक्षकांनी संस्थेचे आभार मानले.
भारतीय सिंधू सभेच्या वतीने सिंधी समाजाचे इष्टदेव झुलेलाल देवजींच्या चालीहो उत्सवानिमित्त प्रारंभी पूज्य बहिराणो साहिबची पूजा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आरती व पल्लव चा कार्यक्रम झाला. यावेळी मोठ्या संख्येने भावीक उपस्थित होते.
तसेच याप्रसंगी गो शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ विभाजन विभीषीका स्मृती दिवस (14 ऑगस्ट) निमित्त एक फोटो प्रदर्शनी लावण्यात आली होती. त्यात फाळणीच्या वेळी (1947 साली) घडलेल्या दुःखद घटनांशी संबंधित फोटो लावण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन रुपचंद मोटवानी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद मिळाला. अनेकांनी प्रदर्शनी पाहताना फाळणीच्या वेळी लोकांनी सहन केलेल्या हाल अपेष्टा बद्दल हळहळ व्यक्त केली.
या एकत्रित कार्यक्रमाप्रसंगी गायक किशोर शेरवानी यांचा भक्ती गीतांचा भजन संध्या कार्यक्रम झाला. सुमधुर संगीतमय कार्यक्रमांचा मुलांनी आणि उपस्थितांनी मनसोक्त आनंद घेतला.
भारतीय सिंधू सभेचे प्रदेश उपाध्यक्ष दामोदर बठेजा यांनी जिल्हाध्यक्ष रमेश कुकरेजा यांच्या दोन वर्षाच्या यशस्वी कारर्किद बद्दल सत्कार केला. यावेळी सिंधी समाजाचे सुरेश हिरानंदानी,जयकुमार रंगलानी, डॉ.टेकवाणी, महेश केवलरामाणी, मनु कुकरेजा, रमेश तनवानी, हरगोविंद चिमनानी आदी मान्यवर तसेच सतनाम साक्षी गोशाळेचे जीवतराम हिरानंदानी, सुनिल बजाज, मुकेश जाधवाणी, नंदलाल बजाज, खानचंद बजाज, मुलचंद तलरेजा आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जितेश सचदेव, किशन पंजवानी, मोती आहुजा, व्दारका किंगर, राहुल बजाज, सागर बठेजा, मुकेश आसनानी, किशोर रंगलानी, ओम कुकरेजा, जयकुमार खुबचंदानी, अशोक आहुजा, प्रेम बाजाज, जियंद रोहिडा, अशोक नवलानी, अशोक सचदेव, राम बालानी, अजय शादीजा, मनोज कृपलानी, रुपचंद मोटवाणी, आनंद कृष्णानी, उत्तम छुटाणी, शंकर अंदानी, हरि पमनानी आदिंनी विशेष परिश्रम घेतले.
सुत्रसंचालन जितेश सचदेव यांनी केले व दामोदर बठेजा यांनी आभार मानले.