आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांच्या वतीने पोलीस उपाधीक्षक यांना निवेदन.

मयत अक्षरा पवार हिच्यावर बलात्कार करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यासाठी आई मीना साळवे यांनी केली मागणी.

अहमदनगर (प्रतिनिधी)- मयत अक्षरा पवार हिच्यावर बलात्कार करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांना निवेदन देताना मळ्यात मुलीची आई मीना साळवे, वडील अखलेश साळवे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुमेध गायकवाड आदीसह आंबेडकरी चळवळी मधील कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, ५ जून २०२४ रोजी अक्षरा पवार हिच्या मोबाईल कॉलवरून उपलब्ध रेकॉर्डिंग नुसार दौंड येथील इसम प्रकाश आबाजी भालेराव यांच्या फ्लॅटवर २ इसमांनी अक्षरा पवार हिला कोंडून ठेवले होते असे आम्हाला समजले व आम्ही नजीकच्या दौंड पोलीस स्टेशनला तेथील पोलीस निरीक्षक यांना कळवले असता त्यांनी संबंधित इसमनामे अख्तर अहमद शेख या इसमाला फोन करून बोलावले असता माझ्या मुलीला सदर मुलगा लगेच पोलीस स्टेशनला घेऊन आला होता. त्या दिवसापासून माझी मुलगी अस्वस्थ होती. तिला त्या दिवसापासून शारीरिक व्याधी सुरू झाल्या होत्या अचानक चक्कर येऊन पडण्याची बाब १३ ऑगस्ट रोजी तपोवन रोड सावेडी अहमदनगर या ठिकाणी डॉक्टरांकडे तपासणी केली असता गर्भवती आढळून आली. म्हणजेच मयत अक्षरा पवार ही गरोदर होती अशा अवस्थेत सदर इसम नामे अख्तर अहमद शेख, प्रकाश आबाजी भालेराव, बापू वाघमारे व इतर दोन ते तीन जण यांनी मिळून मुलीवर बलात्कार केला आहे व रिटा शामवेल काळे हिच्या मदतीमुळे वरील इसम माझ्या मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले आहे. त्यावेळेस माझी मुलगी सतत या लोकांबद्दल म्हणत होती की हे लोक खूप डेंजर आहेत त्यांना काही बोलू नको हे लोक मला मारून टाकतील मी सुद्धा घाबरून कोणाला काही बोलत नाही मला देखील खूप मानसिक व शारीरिक त्रास देत आहे. सदर प्रकरणी मयत झालेल्या दुसऱ्या दिवशी अख्तर अहमद शेख, प्रकाश आबाजी भालेराव, बापू वाघमारे यांनी आई मीना साळवे यांना फोन करून म्हणाले की पोलीस स्टेशनला तक्रार करू नको किंवा कोणाला काही याविषयी बोलू नको व जीवे मारण्याची धमकी दिली आहे व वारंवार माझ्या घराच्या बाहेर चकरा मारून आमच्यावर दबाव टाकण्यासाठी हे सर्वजण तिथे येतात व आम्हाला धमकावत व दबाव टाकत असल्याने हे वरील आरोपी मृत्यूस कारणीभूत असल्याने यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा आंबेडकरी समाजाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येणार आहे.