जखणगाव येथे अल्पवयीन मुलीवर अतिप्रंसग प्रकरणी संतप्त गावकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन !

मोकाट आरोपीला तात्काळ अटक करावी अशी गावकऱ्यांची मागणी

अहमदनगर : जखणगाव येथील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या सह आरोपीन तात्काळ अटक करावी या मागणी साठी नगर कल्याण महामार्गावर येथे आज सकाळी दहा वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आरोपीस अटक न झाल्यास दोन दिवसानी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी पोलीस प्रशासनाला दिला आहे. आरोपीस अटक केली जाईल असे आश्वासन तालुका पोलीस स्टेशन चे निरिक्षक प्रल्हाद गिते यानी दिला. जखणगाव येथे पाच सहा दिवसापुर्वी अल्पवयीन मुलीवर अतिप्रंसग करण्याचा प्रयत्न केला. याबाबत नगर तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली. मात्र एफआय आर मधील क्र६७४ मधील सह आरोपीला तात्काळ अटक न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्याबाबतचे निवेदन दिले होते मात्र सह आरोपीला अटक न झाल्यामुळे आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच सदर गुन्हा दडपण्यासाठी मुलींच्या कुंटुबीयांना धमकी आणि अमानुष मारहाण करण्यात आली. याबाबत तालुका पोलीस स्टेशनमध्ये ६७४ क्रंमाक नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यात मुख्य आरोपीना अटक करण्यात आलेली आहे. पंरतु सह आरोपी अध्यापही मोकाट फिरत आहेत आणि अप्रत्यक्षपणे मुलींच्या कुंटुबीयावर दबाव टाकत धमकी देण्याचा प्रकार घडत आहे. पोलीस प्रशासनातर्फे या घटनेची गंभीर दखल न घेता आरोपीना मोकाट सोडून मुलीला किंवा तिच्या कुंटुबियांना काही इजा किंवा त्रास झाल्यास प्रशासन यास जबाबदार असेल सदर घटनेचा गांभीर्य ओळखून इतर सह आरोपींनी तात्काळ २४ तासाच्या आत करा, असे निवेदन दिले होते. यावेळी सरपंच डॉ. सुनील गंधे, माजी जिल्हा परीषद सदस्य संदेश कार्ले, पचायत समिती माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार, समता परिषद तालुका अध्यक्ष रामदास फुले, माजी सरपंच राजाराम कर्डीले,सह गावातील ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त मोठया प्रमाणात तैनात होता.