मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीत तीन नावे

महायुतीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण हे अद्याप जाहीर झाले नसले तरी तिन्ही पक्षांनी आपापल्या नेत्याचे नाव पुढे रेटले आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या नेत्याचा आग्रह धरला. भाजपला ही संधी मिळाली तर देवेंद्र फडणवीस यांचेच नाव समोर असेल, आमच्या मनात तेच नाव आहे, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले. अर्थात आमचे नेतृत्व त्याबाबत अंतिम निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले. शिंदेसेनेचे नेते आ. संजय शिरसाट म्हणाले, की एकनाथ शिंदे यांचेच नाव आमच्या मनात आहे; निवडणुकीनंतर तिन्ही पक्ष त्याबाबत काय ते ठरवतील. अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली चाकणकर म्हणाल्या की, प्रत्येक पक्षाला आपल्या नेत्यास संधी मिळावी असे वाटते. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हीच आमची इच्छा आहे.