जिल्हा मराठा समाज सेवा मंडळाचे वतीने मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा ; गुणवंत विद्यार्थ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मराठा समाज सेवा मंडळाचे वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मराठा व मराठा कुणबी समाजातील मार्च २०२४ या 10 वी शालान्त परिक्षेत ९५ टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा लवकरच गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात येणार आहे, या विद्यार्थ्यांना मंडळाचे वतीने प्रमाणपत्र व प्रोत्साहन बक्षीस देण्यात येणार आहे. तरी 10 वी परीक्षेत ९५ व त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेल्या मुला-मुलींनी आपले 10 परीक्षेचे गुणपत्रक झेरॉकस व पत्ता स्वताचे किंवा पालकांचे मोबाईल/ व्हाटअ‍ॅप नंबरसह मंडळाचे मुख्य कार्यालय बारातोटी कारंजा, बडोपंताची हावेली, माळीवाडा, अहमदनगर या ठिकाणी असलेल्या जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात येत्या १५ दिवसांचे आत म्हणजे दिनांक ०३ ऑक्टोंबर २०२४ पर्यंत जमा करावीत, असे समाजबांधवांना अहवान मंडळाचे सहसचिव बाळकृष्ण मारुती काळे यांनी केले आहे.