डॉ. विखे पाटील आयटीआयमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन संपन्न
अहमदनगर : अहमदनगर मधील प्रसिध्द असलेल्या डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे आय. टी आय एम.आय.डी.सी. अहमदनगर येथे शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन दुरदृष्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी व कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते झाले.
तसेच डॉ.विखे पाटील आय.टी.आय. मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन कॉलेजचे माजी विदयार्थी व उद्योजक लांडे भाऊसाहेब सुर्यभान संचालक, बी.एस.इंजिनियर्स, एम.आय.डी.सी. अहमदनगर व शासकिय अधिकारी अश्विनकुमार बिडकर यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी आय.टी.आय, मधील सर्व स्टाफ उपस्थित होता. काळाची गरज ओळखून तसेच उद्योगधंदयाची निकड लक्षात घेवून या कौशल्य केंद्रामध्ये पुढील दोन कोर्सेस सुरु करण्यात आलेले आहेत. सोलर प्लॅट इन्स्टॉलेशन टेक्निशियन व इलेक्ट्रिकल मल्टी स्किल टेक्निशियन, प्रदुषण विरहीत सौर उर्जा हीच भविष्य काळातील मोठी कांतीकारक गरज असणार आहे, त्यांची माहिती, प्रसार, दैनंदिन जीवनात सौर उपकरणांचा जास्तीत जास्त वापर, त्याविषयी शास्त्रोक्त शिक्षण घेणे गरजेचे आहे. त्यामुळे डॉ.विखे पाटील आय.टी.आय. मध्ये हे कोर्सेस सुरु करण्यात आले आहेत. अशी माहिती प्राचार्य अनिल सुर्यवंशी यांनी दिली. या उपक्रमाबद्दल महसूलमंत्री आणि संस्थेचे चेअरमन राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुजय विखे पाटील, डायरेक्टर डॉ.पी.एम.गायकवाड, डायरेक्टर डॉ. अभिजीत दिवटे, डेप्युटी डायरेक्टर सुनिल कल्हापुरे यांनी कॉलेजचे कौतुक केले, आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.