आदर्श गाव हिवरेबाजार राष्ट्रनिर्माणाची प्रयोगशाळा!
अहिल्यानगर – हिवरेबाजार येथे पंचायतीच्या पुढाकारातून व ग्रामसभेच्या पाठबळातून केलेल्या विकासकामांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे गावातील दारद्रीय व स्थलांतर थांबले आणि पाणी, माती व पर्यावरणाचा विचार या गावात होतो आहे म्हणून हिवरेबाजार हे राष्ट्रनिर्माणाची प्रयोगशाळा आहे, असे प्रतिपादन विशेष निवडणूक निरीक्षक राममोहन मिश्रा यांनी केले. विशेष निवडणूक निरीक्षक पदी अहिल्यानगर पदी नेमणूक झालेले मिश्रा यांनी आदर्श गाव हिवरेबाजारला भेट दिली आणि संपूर्ण विकास कामांची पाहणी करून पद्मश्री पोपटराव पवार यांनी माहिती सांगितली. तसेच त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मिश्रा म्हणाले, हिवरेबाजार येथे पंचायतीच्या पुढाकारातून व ग्रामसभेच्या पाठबळातून केलेल्या विकासकामांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे गावातील दारिद्र्य व स्थलांतर थांबले. या गावात पाणी, माती व पर्यावरणाचा विचार होत आहे म्हणून हिवरेबाजार ही राष्ट्रनिर्माणाची प्रयोगशाळा आहे. हिवरेबाजार येथे झालेल्या विकासकामाची यशोगाथा आयआयएम, आयआयटी, मसुरी प्रशिक्षण केंद्र याठिकाणी प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासाठी ठेवण्यास सांगितले. प्रशिक्षणात न काम समजते परंतु अंतरमनातील प्रेरणा महत्वाची असून ती मला हिवरे बाजारमध्ये मिळाली. सन २००७ हिवरे बाजारला प्रथम राष्ट्रीय जल पुरस्कार मिळाला तेव्हा ते जलसंपदा मंत्रालयाचे सचिव होते. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलिस अधीक्षक राकेश ओला, रफिक नाईकवडी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपस्थित होते.