दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात; जिल्ह्यामध्ये 30 दिवसांत १ लाख हजार रुग्णांवर उपचार
अहिल्यानगर : जलशुद्धीकरणासाठी वापरली जाणारी टीसीएल पावडर तसेच ३३ गावांतील जलनमुने दूषित असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने ठेवला होता. महिनाभरात जिल्ह्यात तब्बल १ लाख १३ हजार ९४२ रूग्णांनी उपचारासाठी रूग्णालयात धाव घेतली होती. त्यात प्रामुख्याने डायरीयासह, व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांची संख्या मोठी असल्याचे आढळून आले. तापमानाचा पारा मागील काही दिवसांत ११ अंशापर्यंत घसरला आहे. वातावरणात अचानक झालेल्या बदलाचा परिणाम आरोग्यावर होत आहे. रुग्णालये व्हायरल इन्फेक्षणमुळे भरले आहेत. महिनाभरात जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची माहिती घेतली, असता तब्बल १ लाख १३ हजार ९४२ रूग्णांची तपासणी केल्याचे समोर आले. आरोग्य विभागाने जलजन्य आजारांचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाभरातील १४ गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठवून उपाय योजना करण्याचे आदेश दिले आहेत. जलशुद्धीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या टिसीएल पावडरचे नमुणे निकृष्ट आढळले असून सुमारे ३० गावांतील पाणीपुरवठाही दूषित असल्याचे जिल्हा प्रयोगशाळेच्या अहवालातून समोर आले होते. यापाश्वभूमीवर प्रभावी उपाय योजना करण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिल्या आहेत.