एकलव्य संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन
निंबोळी येथे ४० वर्षापासून नदीपात्राच्या जागेत राहणाऱ्या भिल्ल आदिवासी कुटुंबीयाला घर पाडण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी.
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर येथील निंबोडी गावातील श्रीमती लताबाई महादेव माळी हे 40 वर्षापासून गट नंबर.३०९ च्या शेजारी असलेल्या नदीच्या पात्रात राहत असुन तेथेच शेती करून उदरनिर्वाह चालवत आहे व घराच्या शेजारी गट नंबर ३०९ गटाचे मालक सर्जेराव रभाजी करांडे हे आम्हाला ३ वर्षापासून त्रास देत आहे व तेथे राहू नका राहते घर पाडून देऊ असे सांगून खोटे नाटे गुन्हे दाखल करत असून सदर व्यक्तीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी एकलव्य संघटनेचे महाराष्ट्र संघटक मोहन गोलवाड, महाराष्ट्र संघटिका वैजयंता गोलवाड व नाशिक सभापती शिवाजी ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी शिवराम माळी, श्रीमती लताबाई महादेव माळी, महादेव माळी व कुटुंबीय उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हंटले आहे की, आम्ही ४० वर्षापासून येथे राहत आहे मात्र कोणतेही कारण नसताना सदर व्यक्ती हा आम्हाला राहते घर पाडूनदेऊ अशी धमकी देऊन विविध खोटे नाटे गुन्हे आमच्या कुटुंबीयांवर दाखल करत आहे व आम्हाला नेहमी शिवीगाळ मारहाण व जातीय वाचक शिवीगाळ देत असून सदर व्यक्तीवर ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच सदर व्यक्तीने त्याचे क्षेत्र मोजणी करून घ्यावे व आम्हाला नदीपात्रात राहून देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.