शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनात चि. अबीर डोलारे प्रथम
'प्रदूषण परीक्षण आणि स्वचालित संयंत्र ' या मॉडेल चे सादरीकरण
नगर – NCERT द्वारा आयोजित शहर स्तरीय आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर झाला. कॅरोमल कॉन्व्हेन्ट स्कूल येथे पार पडलेल्या शहरस्तरीय आंतरशालेय गणित विज्ञान आणि पर्यावरण विषयक प्रदर्शनाचा निकाल माननीय उपायुक्त श्री विजयकुमार मुंडे यांच्या उपस्थितीत जाहीर झाला.
यात विज्ञान विभागात ५ वी ते ८ वी गटात भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल चा विद्यार्थी चि.अबीर सागर डोलारे याने सादर केलेल्या ‘प्रदूषण परीक्षण आणि स्वचालित संयंत्र ‘ या विषयास प्रथम क्रमांक दिला आहे. या निकालाबरोबरच त्याची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. या प्रदर्शनात ४७ शाळांचे ३०७ उपकरणे प्रदर्शित करण्यात आली.
सदर मॉडेल साठी त्याच्या अध्यापिका सौ. क्षीरसागर मॅडम , श्री व्यवहारे सर, श्री केदारे सर तसेच त्याचे पालक श्री सागर व सौ प्राजक्ता डोलारे यांचे सहकार्य लाभले .
चि. अबीरला मान्यवरांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी अहील्यानगर महापालिका उपायुक्त विजयकुमार मुंडे, कॅरोमल कॉन्व्हेन्ट स्कूल च्या मुख्याध्यापिका निशा जोसेफ, ॲड शिजी जॉर्ज, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर , गणित संघाचे अध्यक्ष श्री सुखदेव नगरे, विज्ञान संघाच्या अध्यक्षा काजल महांदुळे आदी उपस्थित होते.
या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.