राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भिंगार शहरातील विविध प्रश्नाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मोरे यांना निवेदन.
भिंगार शहरात स्ट्रीट लाईट व मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर- विशाल बेलपवार.
नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भिंगार शहरातील विविध समस्यांबाबत आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाने भिंगार शहर सरचिटणीस विशाल(अण्णा) बेलपवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांना निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संपत तात्या बेरड, कलगीतुरा मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब कर्डीले, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक शहराध्यक्ष अकील शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सागर चवडंके, अनिल पापा सारसर, राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष संकेत झोडगे, उपाध्यक्ष दिनेश लंगोटे, महर्षी वाल्मिक स्वामी फौंडेशनचे अध्यक्ष प्रविण घावरी, अखिल मेहतर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनी खरारे, राजू नायर, सचिन रोकडे, भारत ठोकल आदी उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, भिंगार शहरात मोकाट भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर होत असून रात्री अपरात्री नागरिकांना घराबाहेर येणे जाणे अवघड झाले असून तरी नागरिकांना मोकाट कुत्र्यापासून संरक्षण मिळावे यासाठी लवकरात लवकर कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावे व भिंगार नाल्यावर कचरा पडल्यामुळे संपूर्ण परिसर हे घाणीचे साम्राज्य झाले आहे. त्याच कारणाने संपूर्ण परिसरात व रस्त्यावर दुर्गंधी पसरून रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे परिसराची स्वच्छता करण्यात यावी तसेच भिंगार अर्बन बँक येथील गटारी हे तुंबलेल्या आहे ते साफसफाई करण्यात यावी तसेच भिंगार शहरात गेल्या बऱ्याच दिवसापासून मुख्य रस्त्यावर श्री. गुरु गोरक्षनाथ मंदिर आहे त्या ठिकाणी दररोज भाविक दर्शनासाठी येत असतात तिथे स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे व मुख्य रस्त्यावर देखील लाईट बंद असल्याकारणाने रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे बंद असलेल्या ठिकाणी लाईट चालू करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.